Join us

“करण जोहर, आदित्य चोप्रा काम देत नाहीत तर मी काय करू?”; अनुपम खेर असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 13:41 IST

Anupam Kher : अनुपम खेर यांनी आपल्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडच्या जवळजवळ सर्वच दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांसोबत त्यांनी कामं केलं. पण सध्या करिअरच्या या टप्प्यावर त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ( Anupam Kher) यांनी आपल्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडच्या जवळजवळ सर्वच दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांसोबत त्यांनी कामं केलं. पण सध्या करिअरच्या या टप्प्यावर त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. होय, करण जोहर (Karan Johar ), आदित्य चोप्रा (Aditya Chopra ), साजिद नाडियाडवाला यांच्यासारखे बॉलिवूडचे बडे मेकर्सनी आपल्याला काम देणं बंद केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. मी आता मेनस्ट्रिम सिनेमाचा भाग राहिलेलो नाही. करण जोहर, साजिद नाडियाडवाला, आदित्य चोप्राचा एकही सिनेमा ती करत नाहीये. कारण या लोकांनी मला सिनेमे ऑफर करणं बंद केलं आहे. एकेकाळी मी या लोकांचा आवडता होतो. मी सर्वांसोबत काम केलं. पण आता त्यांना मी नकोय. मी त्यांना दोष देत नाहीये. त्यांनी काम देणं बंद केल्यामुळे मी तेलगू, तामिळ सिनेमांत काम करणं सुरू केलं.

सूरज बडजात्याच्या ‘ऊंचाई’ या सिनेमातही काम करतो. हे सिनेमे माझ्याकडे आहेत म्हणून नाहीतर मी खाली बसलो असतो. माझे एकेकाळचे मित्र व जवळचे लोक मला काम देणार नसतील तर मी काय करू? मला त्रास होतो, दु:ख होतं. मी तर यांच्या सिनेमात काम करायचो आणि आता ते मला चित्रपटात घेत नाही, हा विचार करून मी दु:खी होतो, असं अनुपम खेर म्हणाले.

अनुपम खेर ‘उंचाई’ या चित्रपटाशिवाय कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या सिनेमात दिसणार आहेत. अलीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ हा त्यांचा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. कार्तिकेय 2 हा त्यांचा सिनेमाही हिट राहिला.

टॅग्स :अनुपम खेरकरण जोहरआदित्य चोप्रा बॉलिवूड