Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:23 IST

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये कपिल शर्माने विकीचा भाऊ सनी कौशलसोबत मजा मस्ती केली. या एपिसोडचा धम्माल व्हि़डीओ बघा

'द ग्रेट इंडियन कपिल शो' ची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा शो दर शनिवारी नेटफ्लिक्सवर सुरु आहे. आतापर्यंत या शोचे तीन एपिसोड आलेत. तीनही एपिसोडना प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. या शोच्या निमित्ताने सुनील ग्रोव्हर-कपिल शर्मा अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. या शोच्या नवीन एपिसोडमध्ये विकी कोशल - सनी कौशल ही सख्ख्या कलाकार भावंडांची जोडी सहभागी झाली होती. त्यावेळी कपिल शर्माने विकीचा भाऊ सनीला शर्वरीच्या नावाने चिडवलं. मग पुढे काय झालं बघा.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत विकी - सनी भावंडं धम्माल करताना दिसत आहेत. यावेळी कपिल बोलता बोलता गंमतीत मुद्दाम म्हणतो की,  "व्हॅलेंटाईन डे १४ शर्वरीला असतो. सॉरी १४ फेब्रवारीला." यावर सगळेच हसतात. सनीला सुद्धा गंमत कळून तो सुद्धा खळखळून हसतो. अशातच विकी म्हणतो, "तुझ्या उत्तराची वाट बघत नाही आहेत ते. त्याने पंचलाईन अर्थात विनोद करुन झालाय."

सर्वांना माहितच आहे की, सनी कौशल आणि शर्वरी वाघ हे एकमेकांना डेट करत आहेत. शर्वरी विकी - कतरिनाच्या लग्नात सुद्धा सहभागी होती. सनी - शर्वरीने 'द फॉरगॉटन आर्मी' वेबसिरीजमध्ये एकत्र अभिनय केला. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. अर्थात दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपचा जाहीर खुलासा अजून केला नाही. कौशल भावंडं असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा हा नवीन भाग तुम्हाला शनिवारी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

टॅग्स :कपिल शर्मा विकी कौशलसनी कौशलकतरिना कैफ