Join us
Daily Top 2Weekly Top 5

BB17: 'तिने शो मध्ये यायलाच नको होतं'; विकीसोबतच्या भांडणांमुळे काम्या पंजाबीचा अंकिताला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 14:11 IST

Kamya punjabi: काम्याने अंकिताला आणखी एक सल्लाही दिला आहे.

छोट्या पडद्यावर अलिकडेच बिग बॉसचं १७ वं (bigg boss 17) पर्व सुरु झालं आहे. जसजसा हा कार्यक्रम पुढे सरकत आहे तसंतशी त्याची रंगत वाढत आहे. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि तिचा पती विकी जैन (vicky jain)  ही जोडी या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचं प्रेम दाखवणारी ही जोडी बिग बॉसच्या घरात सतत भांडत आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या नात्यावर ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेदेखील तिचं मत मांडलं आहे.

काम्या पंजाबी सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी भाष्य करत असते. यावेळी तिने अंकिता आणि विकी यांच्यातील वादावर तिचं मत मांडलं आहे. अंकिताने विकीसोबत या शोमध्ये सहभागी व्हायचंच नव्हतं, असा सल्ला तिने दिला आहे. काम्याने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहिली आहे.

नेमकं काय म्हणाली काम्या?

'मला खरंच अंकिता आवडते. पण, आज मला असं वाटलं की तिने या शो मध्ये यायला नको होतं. आणि, त्यातही तिच्या नवऱ्यासोबत तर बिल्कूलच नाही. मला खात्रीये की विकी आणि तिच्या नात्यात उशीर होण्यापूर्वी ती हा गेम समजेल', असं काम्याने म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी सहभागी झाल्यापासून सातत्याने एकमेकांशी भांडत आहेत. इतकंच नाही तर या घरातलं विकीचं वागणं पाहून याच्याशी लग्न करुन मला पश्चाताप होतोय असंही अंकिता म्हणाली आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसकाम्या पंजाबीटेलिव्हिजन