Join us
Daily Top 2Weekly Top 5

Justin Bieber Net Worth : 200 कोटींचं घर आणि महागड्या गाड्या, जस्टिन बीबर आहे 'इतक्या' हजार कोटींचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:52 IST

राधिका आणि अनंतच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन चार चाँद लावणार आहे.

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार जस्टिन बीबरला कोण नाही ओळखत.  जस्टिन बीबरच्या 'बेबी' या गाण्याने भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड सुरू झाला होता. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ग्रॅमी जिंकणाऱ्या जस्टिन बीबरने अनेक जागतिक विक्रम केले आहेत. जगभरात जस्टिनच्या गाण्यांची क्रेझ आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आहे आणि कारण अनंत अंबानीच लग्न ठरलं आहे.

मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याची चर्चा भारतात नाही जगभरात होत आहे. अंबानीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमात जगभरातील प्रभावशाली व्यक्ती हजेरी लावत आहेत.  प्री-वेडिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने परफॉर्म केलं होतं. तर आता राधिका आणि अनंतच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन चार चाँद लावणार आहे. यासाठी तो मुंबईत दाखल झाला आहे. पण, अनेकांना जस्टिन बद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक नाहीत. जस्टिन नक्की कोण? त्याची संपत्ती किती? त्याची लोकप्रियता इतकी का आहे? तर याबद्दल आपण जाणून घेऊया. 

जस्टिन बीबर आपल्या गाण्यांमुळे जगभरात लोकप्रिय आहे. जगातील सर्वात यशस्वी गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो. या कॅनेडियन पॉप गायकाने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जगभरात जे स्थान मिळवले आहे, ते स्थान गाठणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. जस्टिन बीबरच्या 'बेबी' गाण्याने भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड वाढवाला होता. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्याही ओठावर हे गाणं राहिलं होतं. 

जस्टिन बीबर हा एखाद्या राजकुमार सारखं आयुष्य जगतो.   कॅलिफोर्नियाच्या बेव्हरली हिल्समध्ये जस्टीनचा स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि सर्व सोयीसुविधायुक्त 200 कोटींचा आलिशान बंगला आहे.  जस्टिन बीबरकडे महागड्या गाड्या आणि अप्रतिम असं घड्याळाचं कलेक्शन आहे. जस्टीन हा वर्ल्ड टूर आणि लाइव्ह कॉन्सर्टमधून कोटींची कमाई करतो. जस्टिन बीबरला मांजरांची खूप आवड आहे. त्याच्याकडे दोन मांजरी आहेत, ज्या त्याने 2018 मध्ये 35 लाख रुपयांना विकत घेतल्या होत्या.

फोर्ब्सनुसार, जस्टिन बीबरने त्याच्या पहिल्या वर्ल्ड टूरमधून 400 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या वर्ल्ड टूरमधून 582 कोटी रुपये कमावले होते. याशिवाय, जस्टिनने 2016-17 च्या वर्ल्ड टूरमधून 2 हजार कोटींची कमाई केली होती. तर त्याच्यावर बनसलेल्या डॉक्युमेंट्रीने तब्बल 600 कोटींचा व्यवसाय केला होता. वयाच्या 20 व्या वर्षी ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारा जस्टिन हा 4 हजार कोटींचा मालक आहे.  वर्षाला अंदाजे 500 कोटी रुपये कमावतो.

टॅग्स :जस्टिन बीबरसेलिब्रिटीबॉलिवूडहॉलिवूडमुंबई