Join us

जुई गडकरीची झाली सर्जरी, खुलासा करत म्हणाली, "डाव्या कानाचा पडदाच फाटला अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 09:25 IST

'ठरलं तर मग' मालिकेविषयी म्हणाली...

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari)  'ठरलं तर मग' मालिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. मालिकेतील तिची सायली ही भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. तसंच अर्जुन-सायलीची केमिस्ट्रीही सर्वांनाच आवडते. काही दिवसांपूर्वीच जुईने तिची एक सर्जरी झाल्याचा खुलासा केला. तसंच तिच्या आजारपणामुळे मालिकेचं शूट थांबलं अशाही चर्चा झाल्या होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने सेटवरचा व्हिडिओ शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तसंच तिला नक्की काय झालं होतं हेही लवकरच सांगेन असं ती म्हणाली होती. आता जुईने व्हिडिओ शेअर करत तिच्या सर्जरीविषयी माहिती दिली. 

जुईने नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणते, "जुलै मध्ये एका छोट्या अपघातात माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता. आतमध्ये रक्त आलं होतं. मला खूपच त्रास होत होता. मी अर्धी बहिरी झाले होते. ते खरंतर स्वत:हून हळूहळू बरं होतं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही वाट बघत होतो. पण ते बरं झालंच नाही. त्यामुळे सर्जरी करायचा निर्णय घेतला. म्हणूनच माझ्या कानात कापूस होता."

ती पुढे म्हणाली, "मला सुट्टी मिळावी म्हणून मालिकेच्या एपिसोड्सची मोठी बँक करुन ठेवली. ट्रॅक तशाच प्रकारे अॅडजस्ट केले गेले. नंतर मी  सर्जरीसाठी पाच दिवस सुट्टीवर होते. मागच्याच आठवड्यात मी आता पूर्ण जोमाने पुन्हा कामावर परत आले आहे. या सगळ्यात मला टीमने खूप पाठिंबा दिला. मला प्राधान्य देत सहकलाकारांनी खूप अॅडजस्ट केलं. अजूनही माझ्या डाव्या कानामागे टाके आहेत. पुढचे काही महिने काळजी घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे."

जुईच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. 'काळजी घे','लवकर बरी हो' असं म्हणत तिच्यावरचं प्रेम दाखवलं आहे.

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेताहॉस्पिटलसोशल मीडिया