Jolly LLB 3 Review: अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला हे त्रिकुट असलेल्या 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 'जॉली एलएलबी ३' आज(१९ सप्टेंबर) सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 'जॉली एलएलबी ३' हा फक्त एक कॉमेडी सिनेमा नसून त्यातून एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलं गेलं आहे. तर वकिलाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदीही सिनेमातून पाहायला मिळते.
काय आहे 'जॉली एलएलबी ३'ची स्टोरी?
'जॉली एलएलबी ३'मध्ये अक्षय कुमार वकील जगदीश्वर मिश्रा आणि अर्शद वारसी वकील जगदीश त्यागीच्या भूमिकेत आहे. तर सौरभ शुक्ला न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी यांच्या भूमिकेत आहेत. बिजनेसमॅन हरीभाई खेतान (गजराज राव) एका शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करून घेतो. त्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी आणि त्याची सून आत्महत्या करत जीवन संपवतात. याबाबत न्याय मागण्यासाठी शेतकऱ्याची पत्नी वकील असलेल्या जॉलीकडे जाते. आता या शेतकऱ्याच्या पत्नीला हे दोघे जॉली कशाप्रकारे न्याय मिळवून देण्यात मदत करतात ही स्टोरी 'जॉली एलएलबी ३'मध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
प्रेक्षकांना कसा वाटला 'जॉली एलएलबी ३'?
'जॉली एलएलबी ३'ची प्रेक्षक वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे.
"हा एक असा कोर्टरुम ड्रामा आहे जो प्रेक्षकांना इमोशन आणि एंटरटेनमेंटचं पॅकेज देतो. अक्षय कुमारचं शेवटचं स्पीच तुम्हाला टाळ्या वाजवायला भाग पाडेल. अर्शद वारसीने चांगलं काम केलंय आणि सौरभ शुक्ला यांचा नवीन अवतार पाहायला मिळेल. गजराज राव यांनी एक उत्कृष्ट व्हिलन साकारला आहे".
"हा सिनेमा शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. या सिनेमातून त्यांची न्यायासाठीची लढाई दाखवली आहे", असं एकाने म्हटलं आहे.
अक्षय कुमार नेहमीच चांगल्या कंटेटचे सिनेमे करतो. त्याचे अनेक सिनेमे यावर्षी प्रदर्शित झाले आहेत. आणि क्वचितच सिनेमांमध्ये वाईट कथा दिसेल. पण, लोकांना चांगल्या गोष्टी नको आहेत. #JollyLLB3
दरम्यान, जॉली एलएलबी ३ सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, गजराज राव, अमृता राव, सीमा बिस्वास, हुमा कुरैशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.