Join us

मराठी अभिनेत्रीने घरीच साकारला मातीपासून लाडका बाप्पा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 11:13 IST

अनेक कलाकार घरातील गणरायाची मूर्ती स्वत:च्या हाताने घरच्या घरीच साकारतात.अभिनेत्री सायली पाटीलनेही घरीच लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवली आहे. 

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. मराठीसह बॉलिवूड कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान होतो. अनेक कलाकार घरातील गणरायाची मूर्ती स्वत:च्या हाताने घरच्या घरीच साकारतात.अभिनेत्री सायली पाटीलनेही घरीच लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवली आहे. 

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गणरायाची मूर्ती बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती साकारताना दिसत आहे. सायलीने बालगणेशाची मूर्ती बनवली आहे. लाडक्या बाप्पाला स्वत:च्या हाताने तयार करतानाचा व्हिडिओ पाहून चाहते सायलीचं कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओला तिने 'प्रथम तुला वंदितो'असं कॅप्शन दिलं आहे. 

सायलीने नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील तिची भावना भाभी ही भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर सायली 'घर बंदूक बिरयानी' या मराठी चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने आकाश ठोसरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अभिनेत्री असण्याबरोबरच सायली इंटेरियर डिझायनरदेखील आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटगणेशोत्सवसेलिब्रिटी गणेश