Join us

तरुणांमधील तणावाला इंटरनेट जबाबदार, जया बच्चन यांनी केलं वक्तव्य, जुन्या पिढीबद्दल म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:50 IST

नातीच्या पॉकास्टमधील जया बच्चन यांची गाजलेली वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची विधानं नेहमीच चर्चेचा विषय असतात. कधी महिलांच्या विषयावर तर कधी सामाजिक, राजकीय विषयावर त्या मत मांडतात. तेव्हा काही विधानं न पटणारीही असल्याने त्या ट्रोल होतात. नात नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी तरुणांमधील वाढत्या अस्वस्थतेवर चर्चा केली. तसंच यासाठी त्यांनी इंटरनेट म्हणजेच सोशल मीडियाला जबाबदार धरलं. नक्की काय म्हणाल्या जया बच्चन बघुया...

'व्हॉट द हेल नव्या' पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी इंटरनेटमुळे होणारे फायदे आणि नुकसान यावर मत मांडलं. त्या म्हणाल्या, " आजकाल तरुणांना सहज सर्व माहिती ऑनलाईन मिळते. सतत मोबाईलवर उत्तरं देण्याचा त्यांच्यावर दबाव असतो. ' यावर नव्या विचारते, 'जुनी पिढी तणावग्रस्त नव्हती का?' तर जया बच्चन म्हणाल्या, 'नक्कीच पूर्वी फार कमी लोकांना नैराश्य यायचं. आम्ही लहान असताना तर डिप्रेशन शब्दही ऐकला नव्हता. लहानपणीच काय नंतरही कधी ऐकला नव्हता. तुम्हाला सतत जेव्हा ऑनलाईन माहिती मिळत असते तेव्हा तुम्ही तणावात जाता. ही मुलगी कशी दिसते? कुठून आलीये? तिने कसा मेकअप केलाय? यामुळे तणाव वाढतो."

नातीच्या पॉकास्टमधील जया बच्चन यांची गाजलेली वक्तव्य

जया बच्चन यांनी याआधी डेटवर बिल भरणाऱ्या मुली वेड्या असतात असंही वक्तव्य केलं होतं. तसंच प्रपोज कायम मुलांनीच केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या होत्या. सध्या नव्याच्या पॉडकास्टमधील त्यांची विधानं खूप चर्चेत आहेत. शिवाय सोशल मीडियावर त्या का नाहीत याचंही उत्तर त्यांनी दिलं. जगाला आपल्याबद्दल आधीच बरंच काही माहित आहे आणखी दाखवण्याची गरज वाटत नाही असं त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :जया बच्चननव्या नवेलीसोशल मीडिया