Join us

Jaya Bachchan: तुम्हाला लाज वाटत नाही..??; जया बच्चन सेल्फीवरून फॅन्सवरच संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:09 IST

जया बच्चन यांनी चाहत्यांना चांगलाच सुनावलं

Jaya Bachchan Angry: महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या त्या नाराज झाल्यावरून त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू आहे. सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांवर त्या चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळाले. जया बच्चन यांनी फॅन्सना अशाप्रकारे हटकणे किंवा फटकारणे हे चाहत्यांसाठी फारसं नवीन नाही. या आधीही त्यांनी सेल्फी घेण्यावर आक्षेप घेत फॅन्सना फटकारले होते. मात्र यावेळी त्या जरा जास्तच संतापल्याचे दिसून आले.

नक्की काय घडला प्रकार?

जया बच्चन या बुधवारी सकाळी मुलगा अभिषेकसोबत भोपाळला गेल्या होत्या. दोघांनी न्यू मार्केटमधील कालीबारी येथे नमाज अदा केली. जया बच्चन आणि अभिषेक यांना पाहून चाहते भलतेच उत्साहित झाले. मग इतर कोणत्याही फॅनप्रमाणे जया बच्चन आणि अभिषेकला भेटायला आणि त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायला चाहत्यांनी गर्दी केली. अभिषेक बच्चन आनंदाने आपल्या चाहत्यांना भेटला, सेल्फीही काढला. मात्र चाहत्यांनी त्यांना घेरून सेल्फी काढल्यामुळे जया बच्चनना ते रूचले नाही.

जय बच्चन यांच्या रागाचा पारा चढला!

त्यानंतर जया बच्चन यांनी चाहत्यांना फटकारण्यास सुरुवात केली. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्या चाहत्यांना हटकत आहेत. व्हिडीओमध्ये जया बच्चन चांगल्याच संतापल्या आहेत. "तुम्ही डोळ्यांवर किती फ्लॅश मारता? तुम्ही लोकं हे काय करत आहात? तुम्हाला लाज वाटत नाही का?", असे जया बच्चन व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. जया बच्चन यांनी फटकारल्यानंतर चाहतेही मागे हटताना दिसले.

टॅग्स :बॉलिवूडजया बच्चनअभिषेक बच्चन