Join us

Jawan Teaser Out: थिएटर रिलीजच्या आधी भेटीला आला शाहरूख खानच्या 'जवान'चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:15 IST

Jawan Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुचर्चित 'जवान' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा आगामी बहुचर्चित 'जवान' (Jawan) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. त्यामुळे अभिनेतादेखील चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज केला आहे. किंग खानने जवानचे नवीन पोस्टर शेअर केले आणि यासोबतच अपडेट दिली की आता जवान रिलीज होण्यासाठी फक्त १ महिना उरला आहे. त्यानंतर त्याने चित्रपटाचा नवीन टीझर शेअर केला.

जवानचा नवीन टीझर दमदार अॅक्शनने परिपूर्ण असा आहे. टीझरमध्ये शाहरूख खानसोबत नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी शाहरुख खानचा ट्रेन सीन येतो आणि अभिनेता अॅक्शन करत सांगतो की, आता चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त १ महिना शिल्लक आहे. शाहरुख खानने जवानचा नवीन टीझर त्याच्या ऑफिशिएल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, बस ३० दिवस उरले आहेत... हे पण निघून जातील...टीक...टॉक.

यासोबतच शाहरुख खानने जवानचं नवीन पोस्टरदेखील रिलीज केले आहे. ज्यात तो ब्लॅक अँड व्हाईट इफेक्टसोबत बाल्ड लूकमध्ये दिसत आहे. पोस्टर रिलीज करत अभिनेत्याने लिहिले की, मी चांगला आहे की वाईट...फक्त ३० दिवसात माहित पडेल. तुम्ही तयार आहात का? जवान ७ सप्टेंबर, २०२३ ला हिंदी, तमीळ आणि तेलगू या भाषेत रिलीज होणार आहे.

'जवान'मध्ये झळकणार हे कलाकार जवानचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली कुमार यांनी केले आहे. चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा आणि सान्या मल्होत्रा दिसणार आहे. विजय सेतुपती व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पादुकोण स्पेशल अपियरन्समध्ये दिसणार आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धी डोगरादेखील जवानमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानदीपिका पादुकोणनयनतारा