Join us

'जाट' सिनेमातील खलनायकाचा चेहरा आला समोर; 'हा' अभिनेता सनी देओलसोबत ऑन स्क्रीन भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:55 IST

'जाट' सिनेमातील खलनायकाचा फर्स्ट लूक समोर आला असून हा लूक काळजात धडकी भरवणारा आहे (jatt)

सनी देओलच्या (sunny deol) आगामी 'जाट' (jatt movie) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सनी देओल अनेक वर्षांनी अॅक्शन अंदाजात दिसणार आहे.  सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमातील खलनायकाचा पहिला लूक समोर आलाय. या सिनेमातला खलनायक सनी देओलपेक्षा खतरनाक असलेला दिसतोय. सिनेमाच्या मेकर्सनी 'जाट' सिनेमाचा नवीन टीझर प्रेक्षकांसमोर आणला असून या व्हिडीओत खलनायकाची पहिली झलक पाहायला मिळतेय.'जाट' सिनेमात हा अभिनेता खलनायक"मुझे मेरा नाम बहुत प्यारा है, रणतुंगा", असं म्हणत 'जाट'च्या टीझरमध्ये रणदीप हुडाची एन्ट्री दिसते. सिगरेट पेटवून, डोक्यावर गोणपाट घेऊन रणदीप हूडा बघायला मिळतो. रणदीपचा आजवर कधीही न बघितलेला खूँखार अवतार  'जाट'च्या नवीन टीझरमध्ये बघायला मिळतोय. अशाप्रकारे सनी देओलसमोर रणदीप तगडा खलनायक म्हणून समोर येणार आहे. त्यामुळे  'जाट' सिनेमात रणदीप आणि सनी पाजीच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार यात शंका नाही.कधी रिलीज होणार  'जाट'?

ॲक्शन एंटरटेनर 'जाट'मध्ये अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. सनीसोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 'पुष्पा २' जेव्हा रिलीज झालेला तेव्हा त्यासोबत 'जाट'चा टीझर १२,५०० स्क्रीनवर दाखवण्यात आला. हा ॲक्शन पॅक्ड टीझर पाहिल्यानंतर सर्वांना जाट सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे. हा सिनेमा १० एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सनी देओलरणदीप हुडाबॉलिवूड