Join us

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने घेतलं तिरुपतीचं दर्शन, शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:31 IST

जान्हवी बरेचदा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने साडी परिधान करुन तिरुपतीच्या दर्शनाला जाते.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)  धार्मिक आहे हे अनेकदा दिसलं आहे. वर्षातून अनेकदा जान्हवी तिरुपतीच्या दर्शनाला जात असते. तिची आई अभिनेत्री श्रीदेवी यांचीही तिरुपतीही खूप श्रद्धा होती. जान्हवी पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने साडी परिधान करुन तिरुपतीच्या दर्शनाला जाते. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने पुन्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. याचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जांभळी साडी, स्टायलिश ब्लाऊज,  सिव्हर ज्वेलरी, कपाळावर टिकली आणि मोकळे केस अशा पारंपरिक लूकमध्ये जान्हवीने फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या हातात तिरुपतीचा प्रसाद म्हणजेच लाडू आहे. जान्हवी प्रसादाचा आस्वाद घेत आहे. तसंच गोड  स्माईल करत फोटोसाठी पोज देत आहे. यासोबतच तिने काही सेल्फीही शेअर केले आहेत. तसंच ती राहत असलेल्या उंच ठिकाणाहून तिने टेरेसावरील फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये खाली निसर्गाचा सुंदर नजारा दिसत आहे. 

जान्हवीच्या फोटोंवर अनेक लाईक्स आले आहेत. तिचं हे पारंपरिक सौंदर्य न्याहाळत राहावं असंच आहे. याआधीही जान्हवीने अनेकदा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपतीचं दर्शन घेतलं आहे. तिची ही धार्मिक बाजू पाहून चाहते अनेकदा तिचं कौतुक करतात.

जान्हवी नुकतीच 'देवारा:पार्ट १' या दाक्षिणात्य सिनेमात दिसली. ज्युनिअर एनटीआरसोबत तिने स्क्रीन शेअर केली. तर आता ती लवकरच रामचरण तेजासोबतही झळकणार आहे. 'RC16' या सिनेमात दोघं एकत्र दिसणार आहेत. शिवाय जान्हवी वरुण धवनसोबतचा तिचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा सिनेमाही रिलीज होणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटमंदिरबॉलिवूड