Join us  

'जब वी मेट २'मधून शाहिद-करीनाचा पत्ता कट! दिग्दर्शकाने सांगितलं गीत-आदित्यच्या भूमिकेत कोण दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:43 PM

गेल्या काही दिवसांपासून 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी भाष्य केलं आहे.

बॉलिवूडमधील सुपरहिट आणि एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक म्हणजे 'जब वी मेट'.  शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. आज १८ वर्षांनंतरही हा सिनेमा प्रेक्षकांचं तितकंच मनोरंजन करतो. या चित्रपटातील करीना आणि शाहिदची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. गेल्या काही दिवसांपासून 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी भाष्य केलं आहे. 

इम्तियाज अली त्यांच्या 'चमकीला' सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'चमकीला' सिनेमानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी 'जब वी मेट'च्या सीक्वलबद्दल भाष्य केलं. "मला जब वी मेटचा सीक्वल काढायचा नाही. कारण, तो सिनेमा परीपूर्ण आहे, असं मला वाटतं. मी कधीच या सिनेमाच्या सीक्वलबाबत विचार केलेला नाही," असं ते इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. याबरोबरच जर 'जब वी मेट'चा सीक्वल आला तर त्यात शाहिद कपूर आणि करीना कपूर दिसणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. नव्या कलाकारांना घेऊन 'जब वी मेट २' बनवला जाईल, असं इम्तियाज अली म्हणाले. 

'जब वी मेट'चा सीक्वल आला तर कोणते कलाकार गीत आणि आदित्यच्या भूमिकेत दिसतील? असा प्रश्न त्यांना विचारत आला. यावर उत्तर देताना त्यांनी गीतच्या भूमिकेत परिणीती चोप्रा आणि आदित्यच्या भूमिकेत दिलजीत दोसांझला घ्यायला आवडेल, असं सांगितलं. परिणीती आणि दिलजीत इम्तियाज अली यांच्या 'चमकीला' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा पंजाबमधील गायक अमर सिंह चमकीला आणि त्यांच्या पत्नीवर आधारित आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :इम्तियाज अलीसिनेमासेलिब्रिटी