स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अक्षर कोठारी आणि ईशा केसकर या दोघांच्या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. परंतु ईशा केसकरने अचानक मालिका सोडली आणि मालिकेच्या टीआरपीवर परिणाम झाला. त्यामुळेच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतून एक्झिट घेतलेल्या ईशा केसकरने यासाठी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. काय म्हणाली ईशा?ईशा केसकरने लिहिली भावुक पोस्ट
'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका बंद होणार असल्याने ईशाने सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील खास आठवणी शेअर केल्या आहेत. या आठवणी शेअर करुन ईशा लिहिते, ''कला... अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून Sorry, तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी कायम ऋुणी राहीन... Thank you so much for everything'' अशा शब्दात ईशाने पोस्ट लिहिली आहे. एकूणच ईशाने मालिका सोडल्यानंतर दोन महिन्यातच 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे ईशाने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
'मुंटा' शी बोलताना ईशाने मालिका का सोडली, याविषयी सांगितलं. ती म्हणाली, 'मी गेली दोन वर्ष सगल काम करत होते. जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी त्या अवस्थेतही शूटिंग करत होते. ही आणखी दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. जर मी विश्रांती घेतली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. भविष्यात डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल.''
" त्यामुळे मी १५-२० दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यां गोष्टींचा विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं."
Web Summary : Star Pravah's 'Lakshmichya Pavlanni' ends after Isha Keskar's exit impacted viewership. Keskar apologized, citing health reasons for her departure. Doctors advised rest to avoid serious eye issues, prompting her decision to leave the show.
Web Summary : ईशा केसकर के शो छोड़ने के बाद 'लक्ष्मीच्या पावलांनी' बंद हो गया क्योंकि दर्शकों की संख्या प्रभावित हुई। केसकर ने स्वास्थ्य कारणों का हवाला देते हुए माफी मांगी। डॉक्टरों ने आँखों की गंभीर समस्याओं से बचने के लिए आराम करने की सलाह दी, जिसके कारण उन्होंने शो छोड़ने का फैसला किया।