काल भारत विरुद्ध पाकिस्तान(ind vs pak) सामना रंगला. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवत पाकिस्तानला हरवलं. या सामन्यात विराट कोहलीने (virat kohli) शानदार शतक केलं. एका क्षणी भारत जिंकणार हे नक्की होतं. सर्वांची नजर विराट सेंच्युरी मारणार का, यावर होती. अखेर विराटने चौकार मारुन स्वतःचं शतक आणि भारताचा विजय साजरा केला. त्यानिमित्ताने विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharma) खास अंदाजात पतीचं अभिनंदन केलं.
अनुष्काची पोस्ट व्हायरलसोशल मीडियावर भारताने पाकिस्तानला हरवल्यावर अनुष्का शर्माने केलेली पोस्ट व्हायरल झालीय. या पोस्टमध्ये अनुष्काने विराटचा फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोवर अनुष्काने नमस्कार केल्याचे दोन इमोजी जोडलेत. शिवाय 'दिल' पोस्ट केलंय. अशाप्रकारे अनुष्काने पती विराटचं आणि टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. अनुष्काने केलेली ही सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल झालीय. अनुष्का कायमच विराटला चीअर करायला मैदानावर उपस्थित असते. परंतु यावेळी मात्र तिने घरबसल्याच विराटच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं.
भारताने पाकिस्तानला हरवलं
विराट कोहलीने काल चॅम्पियन्स ट्रॉफी शतक केले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघासाठी विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावा आणि त्याच्या शतकासाठी असणाऱ्या धावा यात तफावत निर्माण झाली होती. जिंकायला दोन धावांची गरज असताना कोहली ९६ धावांवर खेळत होता. अखेर खणखणीत चौकार मारत त्याने शतकासह भारतीय संघाचा विजय आणखी खास केला. त्यामुळे कोहलीचे जगभरातील भारतीय चाहते खुश झाले अन् टीम इंडिया जिंकल्याने या विजयाचा आनंद द्विगुणित झाला.