Join us

Illeana D'Cruz : प्रेग्नंट? इलियाना डीक्रूजने लग्नाआधीच दिली गुडन्यूज; चाहते म्हणाले, 'वडील कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 10:35 IST

सध्या इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सबास्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुज (Illeana D'Cruz) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन दूर आहे. मात्र तिचे बोल्ड फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र काल अचानक इलियानाने गुडन्यूज सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. कमिंग सून असं म्हणत इलियानाने आज सकाळीच प्रेग्नंसी जाहीर केल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसतंय. मात्र ती खरंच प्रेग्नंट आहे का की हा पब्लिसिटी स्टंट आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

'बर्फी' फेम अभिनेत्री इलियाना डीक्रुजने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो टीशर्टचा आहे ज्यावर 'अँड सो द अँडव्हेंचर बिगिन्स'  असं लिहिलेलं आहे. तर दुसरा फोटो तिच्या गळ्यातील पेंडंटचा आहे. 'mama' (ममा) अशा आशयाचं हे पेंडंट आहे. इलियानाची पोस्ट बघून सगळ्यांना धक्काच बसला आहे. अनेक सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देत आहेत.

इलियाने या फोटोंना कॅप्शन देत लिहिले, 'लवकरच येतोय...माझा छोटा डार्लिंग तुला भेटायची खूप उत्सुकता आहे.'

मात्र या पोस्टमुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. 'लग्न कधी झालं?', 'मुलाचे वडील कोण आहेत?' असे प्रश्न चाहते विचारत आहेत. वास्तविक पाहता इलियाने अजूनही स्पष्टपणे आपली प्रेग्नंसी जाहीर केलेली नाही. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो असंही अनेक जण म्हणत आहेत.

सध्या इलियाना कॅटरिना कैफचा (Katrina Kaif) भाऊ सबास्टियन ला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचे एकत्रित व्हॅकेशनचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत होते. याआधी इलियानाचा अंड्र्यू नीबोनसह ब्रेकअप झाला आहे. दोघेही अनेक वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं संपुष्टात आलं. आता इलियाना आणि कॅटरिनाच्या भावाची चर्चा आहे.

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडप्रेग्नंसीकतरिना कैफसोशल मीडियासोशल व्हायरल