Join us

बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ३८ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई, सोशल मीडियावर जाहीर केली प्रेग्नंसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:22 IST

अभिनेत्री लग्नाआधीच राहिलेली गरोदर, २०२३ साली दिला पहिल्या मुलाला जन्म

'बर्फी' फेम अभिनेत्री इलियाना डिक्रुज (Ileana D'cruz) दुसऱ्यांदा आई होणार आहे. जानेवारी महिन्यात इलियानाने गेल्या वर्षभराची झलक एका व्हिडिओत दाखवली होती. यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या फोटोत तिने प्रेग्नंसी कीट दाखवत पुन्हा गरोदर असल्याची हिंट दिली होती. आता तशीच हिंट तिने पु्न्हा आणखी एक फोटो शेअर करत दिली आहे. यावरुन तिने आपली दुसरी प्रेग्नंसीही कन्फर्म केली आहे. चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

इलियाना डिक्रुजने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने रात्री पाऊण वाजताच्या सुमारास शेअर केला आहे. यामध्ये कुरकुरेचं पॅकेट आहे आणि एक tums antacid चं पॅकेट आहे. यासोबत इलियानाने लिहिले, 'तुम्ही प्रेग्नंट आहात हे न सांगता प्रेग्नंट आहात सांगा (tell me you are pregnant without telling me you are pregnant) . या कॅप्शनसोबत तिने दुसरी प्रेग्नंसी थेट जाहीर केली आहे.

गरोदरपणात सहसा कुरकुरे, वेफर्स असे पदार्थ खायची इच्छा होते. इलियाना आता दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं तिने कन्फर्म केलं आहे. तसंच ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा अंदाज आहे. कारण तिच्या व्हिडिओमध्ये तिने ऑक्टोबर महिन्यात प्रेग्नंसी कीटवर प्रेग्नंट असल्याचं दाखवलं होतं. यावर्षी जून महिन्यात इलियाना दुसऱ्या बाळाला जन्म देईल असा अंदाज आहे.

इलियाना ३८ वर्षांची आहे. २०२३ मध्ये तिने गोंडस मुलाला जन्म दिला. तोवर तिने मुलाचे वडील कोण हे रिव्हील केलंच नव्हतं. त्यामुळे इलियाना लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याच्या चर्चा होत्या. नंतर तिने पतीचं चेहरा दाखवला. इलियानाने २०२४ मध्ये मायकल डोलनसोबत लग्न केलं. आता दोघंही दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.

टॅग्स :इलियाना डीक्रूजप्रेग्नंसीबॉलिवूडसोशल मीडिया