Join us

इलियाना डिक्रूजच्या लहान बाळाची तब्येत बिघडली, शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:41 IST

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिनेइंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट केली. तिच्या बाळाची तब्येत ठीक नसल्याचे तिने म्हटलं. ​​​​

 लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने १ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. सध्या ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट केली. तिच्या बाळाची तब्येत ठीक नसल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 इलियाना डिक्रूजला बाळ होऊन आता 2 महिने झाले आहे. आता तिनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या बाळासोबत आहे. इलियानानं आपल्या मुलाचे नाव कोआ फीनिक्स डोलन असं ठेवलं आहे. 

शेअर केलेल्या फोटोवरुन इलियाना चितेंत असल्याचं दिसत आहे. ती सध्या घरी असून तिच्या मुलाची काळजी घेत आहे.  इलियाना आपला पूर्ण वेळ मुलाला देत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'तुमच्या लहान बाळाला वेदनात पाहून तुम्हाला ज्या वेदना होतात, त्याला सामोरे जाण्याची तयारी कोणीही करु शकत नाही'. 

अभिनेत्री गेल्या काही काळापासून परदेशात राहत आहे. इलियाना डिक्रूजच्या बाळाचे नाव कोआ फिनिक्स डोलन असे आहे. लग्नापुर्वीच प्रेग्नेंट राहिल्यामुळे ती चर्चेत आली होती. इलियानाने १८ एप्रिल २०२३ रोजी ती प्रेग्नंट असल्याची घोषणा केली, त्यानंतर तिने बेबी बम्प फ्लाँट करतानाही फोटो शेअर केलेत. अभिनेत्रीचे अद्याप लग्न झालेले नाही.

इलियानाच्यै कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर तिने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट 'देवासू' होता. साऊथमध्ये हिट ठरल्यानंतर आपला मोर्चा तिने बॉलिवूडकडे वळवला. ती अभिनेता रणबीर कपूरसोबत 'बर्फी' होता. यानंतर ती 'मैं तेरा हीरो', 'रेड' आणि 'बादशाहो' सारख्या चित्रपटात दिसली. ती अखेरची अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल'मध्ये दिसली होती.

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडTollywoodसेलिब्रिटी