संजीवनी पाटील (Sanjeevani Patil) मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख रात्रीस खेळ चाले मालिकेतील वच्छीच्या भूमिकेतून मिळाली आहे. दरम्यान तिने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
संजीवनी पाटीलने सांगितले की, मी जेव्हा जय जय स्वामी समर्थ करत होते त्या दरम्यान जेव्हा तिसऱ्या भागातल्या वच्छीसाठी विचारण्यात आले. मी ती मालिका रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या भागासाठी सोडली. काय फायदा झाला माझा सांगा ना काय फायदा झाला, उलट नुकसानच झालं ना. मी चॅनेल पण कारण ती मालिका ऑन एअर होती. चांगला साडेचार हजार पर डे होता माझा. तो पर डे सोडून मी हे कॅरेक्टर मी जगले किंवा हे काम मी केले. इतकं जे तुमच्या तुमच्यामुळे मी केलंय. का मी असं केलं? मला स्वतःला आता वाटतंय मी का ती मालिका सोडली नुकसान केलं ना ओ माझं मी. काय मिळालं मला काय काय माझं एवढं काय मोठं झालं माझं दिव्य?
ती पुढे म्हणाली की, मी मनाला विचारले सुद्धा की काय एक हजाराने तुझ्या आयुष्यात असा काय फरक पडतो? मी आरश्याशी बोलते हा मला सवय आहे. काय फरक पडत होता तुला हजाराने? नाही पण माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे ना.
मला अभिमान बिलकुल नाहीये, पण मी मराठ्याची जात आहे. मी मराठी पोरगी आहे आणि जिथे मी राहिले ना राबोडी ठाण्यामध्ये. हा विभाग आनंद दिघेंचा आहे. आनंद दिघेंच्या पुढ्यात मी लहानाची मोठी झालेली आहे. त्यांच्याकडून मी बक्षीसं घेतलेली आहेत. मग माझ्यात काय नसणार का तो स्वाभिमान? माझे वडील शिवसैनिक होते. आनंद दिघेंच्या ऑफिसमध्ये माझे वडील जाऊन बसायचे. मी लहान होते.मी त्यांच्याबरोबर जायचे आणि बसायचे असे समोर दिघे साहेब बसायचे.