आपल्या विनोदीशैलीने अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लाफ्टर क्वीन म्हणजे भारती सिंग. आपल्या उत्तम विनोदशैलीच्या जोरावर भारतीने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विशेष म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणारी भारती लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे आई होणार असलेली भारती 'हुनरबाज' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून अजूनही ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. यामध्येच तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे.
कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भारती Oo Antava या गाण्यावर डान्स करत आहे. विशेष म्हणजे यावेळी ती मिथून चक्रवर्तींसोबत डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारती, मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत इन्स्टाग्राम रिल करताना दिसत आहे. या रिलमध्ये ती Oo Antava या गाण्यावर डान्स करत असून हा रिल विकण्यासाठी ती मजेशीर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हा रिल विकण्यासाठी ती काही जणांना खोटा खोटा फोन करते आणि १५ लाख रुपयांना तो रिल विकण्याचा पक्क करते. तिचा हा मजेशीर अंदाज पाहून परिक्षकांसह उपस्थित प्रेक्षकही हसू लागतात.
दरम्यान, भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. भारती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे एप्रिल २०२२ मध्ये ती तिच्या गोड बाळाला जन्म देईल असं म्हटलं जात आहे.