Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनने पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली, एक्स वाईफ सुजैन खानचीही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:00 IST

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आजादचा आज वाढदिवस

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याचं नाव अभिनेत्री-गायिका सबा आजादसोबत (Saba Azad) जोडलं जात आहे. दोघंही डिनर डेट, पार्टी, इव्हेंट्समध्ये हातात हात घालून दिसतात. आात नुकतंच हृतिकने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे. सबा आज तिचा वाढदिवस साजरा करत असून हृतिकने गर्लफ्रेंडसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हृतिकने नुकताच सबा आजादसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघंही पायऱ्यांवर बसलेले आहेत. हृतिकने सबाचा हात धरला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,'आपण सगळेच अशा एका जागेच्या शोधात असतो जिथे तुम्हाला सुरक्षित, प्रभावित आणि छान वाटेल. ज्यासोबत आपण आयुष्यात प्रत्येक अॅडव्हेंचर एन्जॉय करु शकतो. हेच मला तुझ्यासोबत वाटतं. तुझ्यासोबत मी घरात असल्याचीच भावना येते. इथूनच पुढे आपलं खरं अॅडव्हेंचर सुरु होतं.माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तुझे खूप आभार! हॅपी बर्थडे माय लव्ह!'

स्वत:चं थिएटर अन् म्युझिक बँड, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आजादची संपत्ती किती माहितीए का?

हृतिकने 'माय लव्ह' असं संबोधत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे. तर हृतिकच्या या पोस्टवर त्याची एक्स वाईफ सुझैन खाननेही कमेंट केली आहे. 'किती गोड...खूप प्रेम' असं तिने लिहिलं आहे. तर दिया मिर्झा, प्रिती झिंटा, झोया अख्तर यांनीही सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :हृतिक रोशनसोशल मीडियाबॉलिवूड