'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. दुबईतील एका कार्यक्रमात हृतिकने आपल्या मागील 'वॉर २' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीबद्दल स्वतःवरच मिश्किलपणे भाष्य केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय म्हणाला हृतिक रोशन?
हृतिक रोशन नुकताच दुबईमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमाच्या होस्टने त्याला 'सुपरस्टार' म्हणून संबोधित केले. होस्टने दिलेलं हे विशेषण ऐकून हृतिकने लगेच प्रतिक्रिया दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक म्हणतो, "माझ्या मागील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. तरीही इतकं प्रेम मिळत आहे, हे खूप छान वाटत आहे. धन्यवाद.''
हृतिकच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की, तो 'वॉर २'ला व्यावसायिक अपयश जरी मिळालं लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे, त्याच वेळी आपल्या चित्रपटाच्या कामगिरीमुळे स्वतःचीच उपरोधिकपणे मस्करी करत आहे.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'वॉर २'चा निर्मिती खर्च सुमारे ४०० कोटी रुपये होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेनुसार कमाई करू शकला नाही, ज्यामुळे त्याला 'फ्लॉप'चा शिक्का बसला. अशा परिस्थितीत, आपल्या अपयशाबद्दल जाहीरपणे आणि मिश्किलपणे बोलण्याच्या हृतिकच्या या अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि चाहते हृतिकच्या प्रामाणिकपणाचे आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभावाचे कौतुक करत आहेत.
Web Summary : Hrithik Roshan jokingly addressed 'War 2's box office failure at a Dubai event. Despite the film's underperformance, he expressed gratitude for the love he receives. Fans appreciate his self-deprecating humor and honesty.
Web Summary : दुबई में एक कार्यक्रम में ऋतिक रोशन ने मजाक में 'वॉर 2' की बॉक्स ऑफिस पर विफलता को संबोधित किया। फिल्म के खराब प्रदर्शन के बावजूद, उन्होंने मिले प्यार के लिए आभार व्यक्त किया। प्रशंसकों ने उनके आत्म-अवमूल्यन हास्य और ईमानदारी की सराहना की।