Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:13 IST

Hrithik roshan: हृतिक आणि सुझैन यांचं लव्ह मॅरेज होतं. पहिल्याच नजरेत हृतिक सुझैनच्या प्रेमात पडला होता.परंतु, त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या एका आठवड्यापूर्वीच या जोडीने घटस्फोट घेतला.

हृतिक रोशन (Hrithik roshan) हे नाव आज कोणालाही नवीन नाही. 'कहो ना प्यार हैं' या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत एन्ट्री केली आणि रातोरात सुपरस्टार झाला. ग्रीकगॉड या नावाने सर्वपरिचित असलेला हृतिक त्याच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत येत असतो. हृतिकने सुझैन खान हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. काही वर्षांपूर्वीच ही जोडी विभक्त झाली आहे. परंतु, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. यामध्येच या जोडीच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकारांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींची चर्चा होतांना दिसते. यात त्यांचे जुने व्हिडीओ वा फोटो तर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. यामध्येच हृतिक आणि सुझैन यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.  या व्हिडीओमध्ये दोघांमधील प्रेम, मैत्री दिसून येत आहे.

हृतिकच्या hrithik_roshan_fc007 या  फॅनपेजवर त्याच्या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहते भावूक झाले असून त्यांनी हृतिकला पुन्हा सुझैनसोबत पॅचअप करायचा सल्ला दिला आहे.या व्हिडीओमध्ये वरमाला सुरु असतांना हृतिक सुझैनसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतांना दिसत आहे. तर, सुझैनसुद्धा तिचा होकार अभिनेत्याला देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्युज त्याला मिळाले आहेत.

दरम्यान, हृतिक आणि सुझैन यांचं लव्ह मॅरेज होतं. पहिल्याच नजरेत हृतिक सुझैनच्या प्रेमात पडला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी त्याने सुझैनला डेट करायला सुरुवात केली त्यावेळी त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे सुझैन डेटवर गेल्यावर बील भरायची. त्यानंतर हृतिकने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमातून रातोरात सुपरस्टार झाला. सिनेमा हिट झाल्यानंतर या जोडीने  २० सप्टेंबर २००० मध्ये लग्नगाठ बांधली. परंतु, त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या एका आठवड्यापूर्वीच या जोडीने घटस्फोट घेतला.

टॅग्स :बॉलिवूडहृतिक रोशनसुजैन खानसेलिब्रिटीसिनेमा