Join us

Housefull 5: प्रदर्शनाआधीच सिनेमाने कमावले १३५ कोटी, 'हाऊसफुल ५'ची ४५ हजार तिकिटे विकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:28 IST

६ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'हाऊसफुल ५' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

'हाऊसफुल' या फ्रॅन्चायझीचा पुढचा सिनेमा 'हाऊसफुल ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मल्टिस्टेरर सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'हाऊसफुल ५'चा ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. ६ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'हाऊसफुल ५' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

'हाऊसफुल ५' प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच 'हाऊसफुल ५'ने कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची ४५ हजार तिकिटे विकली गेली आहे. यातून सिनेमाने १.५१ कोटींची कमाई केली आहे.  'हाऊसफुल ५' सिनेमा ५ हजार स्क्रीनवर रिलीज केला जाणार आहे. याशिवाय 'हाऊसफुल ५' सिनेमाने सॅटेलाइट राइट्स, डिजिटल राइट्स आणि म्युझिक डीलमधून जवळपास १३५ कोटींची कमाई केली आहे. 

'हाऊसफुल ५' अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फखरी, फरदीन खान, चित्रगंदा सिंह अशी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केला असून साजिद नाडियावालाने निर्मिती केली आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारनाना पाटेकररितेश देशमुख