Join us

होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 16:42 IST

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली.

ठळक मुद्दे पैठणीचा अनोखा खेळ देवाच्या दारी रंगणार आहे

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये लवकरच अशा 'सौं' ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्यांचे ‘अहो’ विठ्ठलाच्या चरणी सेवा अपर्ण करणारे आहेत.

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. भाऊजींनी आळंदी, जेजुरी, नातेपुते, वाखरी आणि पंढरपूर या ठिकाणी रथचालक, चोपदार, वारकरी मंडळींना आयुर्वेदिक औषधं व जेवण देऊन मदत करणारे तसेच रखुमाई आणि विठ्ठल मंदिराचे पुजारी यांच्या कुटुंबाना भेट देणार आहेत. त्यांचासोबत पैठणीचा अनोखा खेळ देवाच्या दारी रंगणार आहे. 

तेव्हा आषाढी एकादशी निमित्त खास होम मिनिस्टर वारी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. आदेश बांदेकर आणि त्याची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचे लव्ह मॅरेज झाले आहे आणि त्यांची प्रेमकथा खूपच इंटेरेस्टिंग आहे. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केले होते. आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या इथे आदेश अनेक वेळा जात असे. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तूला होकार देणार नाही असे सुचित्रा त्यांना बोलली होती. 

टॅग्स :आदेश बांदेकरपंढरपूर वारीआषाढी एकादशीटेलिव्हिजन