हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना हिच्या लॉस एंजेलिसमधील बेव्हरली हिल्स येथील निवासस्थानावर रविवारी (८ मार्च) भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर रिहानाच्या घराच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी रिहाना तिच्या मुलांसह घराच्या आतच होती.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 'लॉस एंजेलिस टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका पांढऱ्या रंगाच्या टेस्ला कारमधून आलेल्या महिलेने रिहानाच्या घराच्या दिशेने अंदाजे १० गोळ्या झाडल्या आणि ती महिला तिथून पसार झाली. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच पोलीस दुपारी १:२१ वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास लावून काही वेळातच त्या महिलेला ताब्यात घेतले.
रिहाना आणि तिचे कुटुंब सुरक्षित३८ वर्षीय रिहाना या घरात तिचा पार्टनर 'A$AP रॉकी' आणि त्यांच्या तीन मुलांसह राहते. सुदैवाने, या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही. घराच्या भिंतींना गोळ्या लागल्या असल्या तरी रिहाना आणि तिचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेली महिला तिच्या कारमधूनच गोळीबार करत होती.पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले असले तरी तिची ओळख अद्याप लपवून ठेवली आहे. तसेच, तिने हा गोळीबार नेमक्या कोणत्या कारणाने केला हे अद्याप स्पष्ट झालेला नाही. रिहानाच्या बाजूनेही या घटनेवर आतापर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. लॉस एंजेलिस पोलीस विभाग (LAPD) सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, रिहानाच्या घराभोवतीची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडक करण्यात आली आहे.
Web Summary : Singer Rihanna's Los Angeles home was shot at. Police arrested a 30-year-old woman suspected of firing multiple shots. Rihanna and her children were home during the incident but unharmed. The motive is under investigation; security has been heightened.
Web Summary : गायिका रिहाना के लॉस एंजिल्स स्थित घर पर गोलीबारी हुई। पुलिस ने एक 30 वर्षीय महिला को कई गोलियां चलाने के संदेह में गिरफ्तार किया। रिहाना और उनके बच्चे घटना के दौरान घर पर थे, लेकिन सुरक्षित हैं। मकसद की जांच जारी है; सुरक्षा बढ़ाई गई।