Join us

Mission Impossible : Tom Cruise चा Mission Impossible चित्रपटासाठी 'सर्वात मोठा स्टंट', Video एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:23 IST

Mission Impossible Series: हा अॅक्शन सीन टॉमने स्वतः केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत...

Mission Impossible : हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ त्याच्या चित्रपटामधील स्टंट स्वतः करतो. त्याची सर्वात लोकप्रिय सिरीज मिशन इम्पॉसिबलमधील स्टंटदेखील टॉमने स्वतः केले आहेत. यासाठी तो अनेक महिने सराव करतो. त्याचा आगाची चित्रपट मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन (Mission Impossible: Dead Reckoning Part 1) मधील स्टंटही त्याने स्वतः केले आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. 

टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल सिरीजचा सातवा भाग पुढील वर्षी रिलीज होत आहे. तत्पूर्वी त्याच्या चित्रपटातील एका मोठ्या स्टंटचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. सोमवारी पॅरामाउंट पिक्चर्सने बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला, ज्यात टॉम आणि चित्रपटाची संपूर्ण टीम अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. 

या धोकादायक अॅक्शन सीनमध्ये टॉम क्रूझला एका डोंगरावरुन गाडी घेऊन उडी मारायची असते. या व्हिडिओ टॉम म्हणतो की, ‘आतापर्यंत मी केलेला हा सर्वात धोकादायक प्रयत्न आहे. मी जे काही करतोय, ते फक्त दर्शकांसाठीच.’ या व्हिडिओमध्ये तो अॅक्शन सीन करण्यासाठी लागलेली अनेक महिन्यांची तयारी दाखवण्यात आली आहे. 

व्हिडिओमध्ये तिथे उपस्थित स्कायडायव्हिंग कोच इशारा देतो की, हा स्टंट चुकला तर गंभीर जखमा किंवा मृत्यू होऊ शकतो. क्रू मेंबर्सपैकी एकाने सांगितले की, हा चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात धोकादायक स्टंट आहे. व्हिडिओच्या शेवटी टॉम यशस्वीरित्या स्टंट पूर्ण करतो. मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन पुढच्या वर्षी 14 जुलै, 2023 ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :हॉलिवूडबॉलिवूड