Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kim Kardashian : लॉस अँजेलिसला पोहचताच किम कर्दाशियननं भारताबद्दल केलं मोठं विधान, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:07 IST

नुकतंच कार्दशियन सिस्टर्स मायदेशी परतल्या आणि तिथं पोहोचताच किमनं भारताबद्दल मोठं विधान केलं आहे. 

अनंत अंबानी व राधिका मर्चंट (Anant Ambani Wedding) शुक्रवारी (१२ जुलैला) मुंबईत लग्नबंधनात अडकले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नासाठी विदेशातून अनेक पाहुणे आले होते, त्यापैकी कार्दशियन सिस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनंत- राधिकाच्या लग्नात, शुभ आशीर्वाद सोहळ्यात व रिसेप्शनमध्ये किम व ख्लोए उपस्थित होत्या. नुकतंच कार्दशियन सिस्टर्स लॉस अँजेलिसला परतल्या आणि तिथं पोहोचताच किमनं भारताबद्दल मोठं विधान केलं आहे. 

किम व ख्लोए या दोघींची अनंत-राधिकाच्या लग्नात खूप चर्चा झाली. कार्दशियन सिस्टर्स या तिन्ही सोहळ्यातील त्यांनी पारंपरिक व वेस्टर्न असा मिलाफ असलेले पोशाख परिधान केले होते. अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा आनंद लुटल्यानंतर आता किम आणि तिची बहिण ख्लोए लॉस अँजेलिसला परतल्या आहेत. तिथं गेल्यावर किमने अनंत-राधिकाच्या रिसेप्शनदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत किमने कॅप्शनमध्ये लिहिले की, "इंडिया हॅज माय हार्ट'.

ख्लोए व किम यांनी तीन दिवस अनंत व राधिकाच्या लग्नातील सर्व सोहळ्यांना हजेरी लावली.  मुंबईतील ताज हॉटेलमध्ये या दोघी बहिणी थांबल्या होत्या. भारतात आल्यावर त्यांनी मुंबईत रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला होता. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.  किमने इशा अंबानी तसेच नवविवाहित जोडप्याबरोबर काढलेले फोटोही पोस्ट केले आहेत. ख्लोए कार्दशियन हिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक स्टोरी व पोस्ट शेअर केल्या आहेत. सध्या या दोन बहिणींची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. 

टॅग्स :किम कार्देशियनभारतसेलिब्रिटीहॉलिवूडमुंबई