सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता हॉलिवूड स्टार मैथ्यू बायर्स याचं निधन झालं आहे. तो ३७ वर्षांचा होता. आत्महत्या करत त्याने जीवन संपवल्याचं कळत आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मैथ्यू बायर्सच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. तर त्याचे चाहते आणि मित्र परिवार यांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मैथ्यू बायर्सने आत्महत्या केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालं आहे. रियल हाऊसवाइव्स या अमेरिकन टीव्ही सीरीजमधून मैथ्यूला प्रसिद्धी मिळाली होती. या सीरिजच्या तिसऱ्या पर्वात तो दिसला होता. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री Melissa Gorga हिने शोक व्यक्त केला आहे. "मॅट तू मला का सांगितलं नाहीस? माझं हृदय तुटलं आहे. तुझी पर्सनॅलिटी कमाल होती. तुला स्टँड अप करायचं होतं. हे तुझं स्वप्न होतं हे मला माहीत आहे", असं म्हणत अभिनेत्रीने श्रद्धांजली वाहिली आहे.
मैथ्यू बायर्सच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा कलाकारांवर असलेल्या तणावाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कलाकारांच्या मानसिक आरोग्याबाबत चर्चा होताना दिसत आहे.