सिनेविश्वातून एक दु:खद घटना समोर येत आहे. विमान अपघातात लोकप्रिय कलाकाराचा मृत्यू झाला आहे. आपल्या संगीताने आणि गायनाने एक काळ गाजवलेल्या सिंगर ब्रेट जेम्स यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लाडका आवाज हरपला आहे.
हॉलिवूड सिंगर, गीतकार आणि संगीतकार ब्रेट जेम्स यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी १८ सप्टेंबरला ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, एका प्रायव्हेट जेटमधून ब्रेट जेम्स प्रवास करत होते. नॉर्थ कॅरोलाइनामधल्या फ्रँकलिन या भागातील एका शाळेच्या जवळ त्यांचं विमान कोसळलं. अपघात झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. या घटनेत विमानात असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ब्रेट जेम्स यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ब्रेट जेम्स हे एक प्रसिद्ध सिंगर होते. त्यांची अनेक गाणी हिट ठरली होती. ५०० पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या म्युझिक अल्बम्सलाही लोकप्रियता मिळाली होती. त्यांना सर्वोत्कृष्ट रिजनल साँगसाठी ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता.