Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या एन्जॉय करून कामावर परतली प्रियंका चोप्रा, 'या' हॉलिवूड चित्रपटात दिसणार देसी गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:05 IST

अमेरिकेत पोहचताच कामावर परतली देसी गर्ल.

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या अमेरिकेत असते. पण काही दिवसांपूर्वी ती संपूर्ण कुटुंबासह भारतात आली होती. पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत जवळपास ती १० ते १५ दिवस भारतात थांबली.  आपल्या कुटुंबीयांसमवेत सुट्या एन्जॉय करून प्रियंका चोप्रा अमेरिकेला रवाना झाली आहे. अमेरिकेत पोहचताच कामाला लागली आहे. याचा एक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्रियंकाने तिच्या आगामी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, जे पाहून तिचे चाहते खूप खुश आहेत. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करून हॉलिवूड प्रोजेक्टच्या स्क्रीप्टची झलक दाखवली आहे. प्रियांका चोप्रा आता 'हेड ऑफ स्टेट' ची शुटिंग करणार असल्याचं फोटोत पाहायला मिळतंय. हे हॅरिसन क्वेरी यांनी लिहिलं आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, "आणि आम्ही परतलो आहोत".

हिंदुस्तान टाईम्सनुसार,  प्रियंका चोप्रा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पुढील प्रोजेक्टचा भाग असणार आहे. प्रियंका सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. नुकतेच एक प्रोजेक्ट फायनल करण्यासाठी तिने चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचीही भेट घेतली होती. मात्र, आतापर्यंत प्रियंका किंवा भन्साळी यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडहॉलिवूड