Join us

'जेम्स बॉन्ड' काळाच्या पडद्याआड; शॉ कॉनरी यांचे 90 व्या वर्षी निधन

By हेमंत बावकर | Updated: October 31, 2020 18:41 IST

James bond movie: शॉ कॉनरी यांनी 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी जेम्स बॉऩ्डची भूमिका साकारली होती.

जेम्स बॉऩ्डपटांमध्ये काल्पनिक परंतू थरारक थरारक मोहिमा यशस्वी केलेले प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते शॉ कॉनरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. जेम्स बॉन्डच्या 007 या सात चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. 

शॉ कॉनरी यांनी 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी जेम्स बॉऩ्डची भूमिका साकारली होती. यामध्ये डॉ. नो, यू अँड ओन्ली लिव्ह ट्वाईस, प्लस डायमंड्स आर फॉरेव्हर आणि नेव्हर से नेव्हर अगेन अशा चित्रपटांचा समावेश आहे. 

याशिवाय त्यांनी मार्नी (1964), मर्डर ऑफ ओरिएंट एक्स्प्रेस (1974), दी नेम ऑफ द रोझ (1986), हायलँडर (1986), हंट फॉर रेड ऑक्टोबर (1990), ड्रॅगनहर्ट (1996), द रॉक (1996) अशाही गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते.  

टॅग्स :हॉलिवूडमृत्यू