जेम्स कॅमेरॉन हे भव्य चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जातात. आपल्या सिनेमामधून ते नेहमीच मोठ्या पडद्यावर अशा कथा मांडतात, ज्या केवळ डोळ्यांना सुखद वाटत नाहीत, तर त्यातून प्रेक्षकांना एक जादुई अनुभव मिळतो. त्यांच्या 'अवतार चित्रपटानं तर जगभरातील कोट्यवधी रसिकांना वेड लावले. आता याच 'अवतार' फ्रँचायझीमधील तिसरा भाग बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड ऍश' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
'अवतार: फायर अँड ऍश' हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट IMAX, 3D आणि प्रीमियम लार्ज स्क्रीन अशा विविध फॉरमॅटमध्ये पाहता येईल. मागील दोन भागांच्या यशानंतर, हा तिसरा भाग देखील ख्रिसमसच्या मुहूर्तावर मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे.
'अवतार: फायर अँड ऍश'चं बजेट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. विविध अहवालानुसार, याचा निर्मिती खर्च सुमारे ३,३०० ते ३,५५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हा अंदाज फक्त निर्मिती खर्चाचा आहे आणि मार्केटिंगसह एकूण खर्च त्यापेक्षा अधिक असू शकतो. 'अवतार' ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट फ्रँचायझी आहे. पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' २०२२ मध्ये प्रदर्शित झाला.
Web Summary : James Cameron's 'Avatar: Fire and Ash' releases in India on December 19, 2025, in IMAX, 3D, and premium formats. The film's budget is reportedly over ₹3,300 crore. This third installment follows the success of 'Avatar' and 'Avatar: The Way of Water'.
Web Summary : जेम्स कैमरून की 'अवतार: फायर एंड ऐश' 19 दिसंबर, 2025 को भारत में रिलीज होगी। फिल्म का बजट ₹3,300 करोड़ से अधिक बताया जा रहा है। यह तीसरा भाग 'अवतार' और 'अवतार: द वे ऑफ वॉटर' की सफलता के बाद आ रहा है।