Join us

लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:59 IST

Rihanna: रिहानाने १३ मे रोजी लॉस एंजलिसमध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. सध्या रिहाना व तिचं बाळ घरी आहे.

प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या (Rihanna)  घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. रिहानाने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची आणि तिच्या बाळाची जोरदार चर्चा आहे. हे बाळ रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी यांचं असून आता लवकरच ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रिहानाने १३ मे रोजी लॉस एंजलिसमध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. सध्या रिहाना व तिचं बाळ घरी आहे. रिहानाने जानेवारी महिन्यात तिच्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना दिली होती. यावेळी तिने बेबी बंपसोबतचे काही फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे प्रेग्नंसी काळात बोल्ड फोटोशूट करुन रिहाना चर्चेत आली होती.

दरम्यान, मध्यंतरी रिहाना आणि रॉकी यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या चर्चा रिहानाने खोडून काढल्या. त्यानंतर ही जोडी आता एका चिमुकल्या बाळाचे पालक झाले आहेत. २०१९ पासून रिहाना व रॉकी एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, येत्या काळात ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :रिहानाहॉलिवूडसेलिब्रिटी