Join us

अवधूत गुप्तेचे सातासमुद्रापार होळी सेलिब्रेशन, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:30 IST

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने नुकताच होळी सण साजरा केला तोही महाराष्ट्रात नाही तर दुबईत.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने नुकताच होळी सण साजरा केला तोही महाराष्ट्रात नाही तर दुबईत. अवधूत गुप्तेचा दुबईतील बॉलिवूड पार्क्स दुबईमध्ये होळीच्या निमित्ताने कॉन्सर्ट पार पडला. यावेळी रंगाची उधळणदेखील करण्यात आली. दुबईतील होळीचे फोटो अवधुत गुप्तेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये १५ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यात अवधूत गुप्ते आणि गुजराती दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने हजेरी लावली होती. यावेळी दुबईकरांना रंगाच्या उधळणीसोबत मराठी व गुजराती गाण्यांचा मनमुराद आनंद लुटता आला. 

अवधुतने कॉन्सर्टच्या वेळेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तो रंगाने रंगलेला दिसतो आहे. या फोटोसह अवधुतने म्हटले आहे बुरा न मानो होली है. लव यू दुबईकर्स. तुम्ही सगळ्यांनी मला थक्क केले. बॉलिवूड पार्क्स दुबईने मला एवढी चांगली संधी दिली त्यासाठी त्यांचा मी आभारी आहे. 

अवधुत गुप्तेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दुबईमध्ये जल्लोष २०१८ हा म्युझिकल कॉन्सर्ट केला होता. या कॉन्सर्टमध्ये मराठी चित्रपटातील गाजलेली व अविस्मरणीय गाण्यांचा समावेश होता. या गाण्याला फ्युजन टच देखील होता. या कॉन्सर्टमध्ये अवधुतसोबत मराठीतील पहिला रॅपर किंग जे.डी. म्हणजेच श्रेयस जाधवदेखील होता. या कॉन्सर्टला दुबईकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

टॅग्स :अवधुत गुप्ते श्रेयश जाधवहोळी 2023