Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीचं बारसं! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीनं केलं मुलीचं नामकरण; ठेवलंय ‘हे’ गोड नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:47 IST

लाडक्या लेकीचं बारसं! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच्या घरी दीड वर्षांनी पाळणा हलला, चिमुकलीचं नाव ठेवलंय खूपच खास 

Sonarika Bhadoria Baby Name: गेल्या काही दिवसांतं मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कोणाच्या घरी मुलगा जन्मला तर कुणाला कन्यारत्न प्राप्ती झाली. अशातच अलिकडेच देवों के देव महादेव फेम अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या घरी ५ डिसेंबरला घरी लक्ष्मीच्या रुपात लेकीचं आगमन झालं. याचा आनंद तिनं सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला होता. आता लेकीच्या जन्मानंतर सोनारिकाने तिचं नावंही जाहीर केलं आहे.

विरिका नावाचा अर्थ (Virika Name Meaning) 

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनारिका भदोरियानं डिसेंबर महिन्यात मुलगी झाल्याची खुशखबर शेअर केली होती. अशातच आता लेकीच्या जन्माच्या १० दिवसानंतर तिनं तिचं नाव जाहीर केलं आहे. घरात लेक आल्याचा आनंद तिने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला होता.  आता नुकतीच सोनारिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर  खास पोस्ट शेअर करत लेकीचं नावही जाहीर केलं आहे. सोनारिकाने तिच्या लाडक्या लेकीचं नाव विरिका (Virika) असं ठेवलं आहे. विरिका म्हणजे'वीरतेचे प्रतीक', 'धाडसी'  असा या नावाचा अर्थ आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनारिकाने 'तुम देना साथ मेरा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वती मातेची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. याशिवाय अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पृथ्वी वल्लभ-इतिहास भी रहस्य भी', 'दास्तान ए मोहब्बत सलीम अनारकली', 'इश्क में मरजावा' या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यानंतर तिने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनारिकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड विकास पराशरसोबत राजस्थानमधील रणथंभौर येथे मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sonarika Bhadoria names her daughter Virika, meaning bravery and courage.

Web Summary : Sonarika Bhadoria, known for 'Devon ke Dev Mahadev', welcomed a daughter on December 5th. She has named her Virika, symbolizing bravery. Sonarika married Vikas Parashar in February 2024. The couple is overjoyed with the arrival of their first child.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया