Join us

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाचा रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:04 IST

अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे.

Hina Khan : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिनं दिली होती. सध्या हिना यावर उपचार घेत आहे. ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्याशी झुंज देत आहे. हिनाने परिस्थितीसमोर हार मानली नसून ती आयुष्यातील या कठीण संकटाशी पूर्ण धैर्याने लढत आहे.

केमोथेरपीच्या वेदनादायक उपचारांदरम्यानही हिनाने स्व:ताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. नुकतंच ती वधूच्या पोशाखात रॅम्पवर चालताना पाहायला मिळाली. लाल रंगाच्या लेहेंग्यात हिना खूपच सुंदर दिसली. तिच्याकडे बघून क्षणभर विश्वास बसणार नाही की ती कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत आहे.  ती पूर्ण आत्मविश्वासाने आणि उत्साहाने रॅम्पवर चालली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.  एकीकडे चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ झाले आहेत. तर दुसरीकडे तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. 

हिनाने रॅम्प वॉकचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझे वडील नेहमी म्हणायचे, डॅडीज स्ट्राँग गर्ल, रडू नकोस, तुझ्या समस्यांबद्दल कधीच तक्रार करू नकोस, आयुष्यावर नियंत्रण ठेव, उभी राहा आणि सामना कर. म्हणून मी आता चिंता करत नाही.  मी सर्व काही देवावर सोडलं आहे. तो तुमचे प्रयत्न पाहतो आणि तुमची प्रार्थनाही ऐकतो. हा रॅम्प वॉक माझ्यासाठी सोपा नव्हता. पण, चालताना मी स्व:ताला सांगत राहिले  थांबू नकोस".  हिनाची ही पोस्ट चाहते भावूक झाले आहेत. या पोस्टवर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीबॉलिवूडटिव्ही कलाकार