Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला आठवडा उलटताच हिना खान पुन्हा डॉक्टरकडे, अभिनेत्रीची कॅन्सरशी सुरु आहे झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:38 IST

सध्या कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री हिना खान लग्नाच्या काही दिवसातच डॉक्टरकडे गेली आहे. हिनाच्या चाहत्यांना यामुळे काळजी वाटली आहे

लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. हिनाने ४ जून रोजी तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघंही हनिमूनसाठी गेले असून तिथूनचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र हनिमूनचा आनंद घेत असतानाच हिनाला त्रास जाणवायला लागला. त्यामुळे तिला डॉक्टरकडे जावं लागलं. हिनाची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. हिनाने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती सर्वांना सांगितली.

लग्नाच्या आठवड्याभरात हिना डॉक्टरकडे, कारण...

हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती सर्वांना दिली आहे. स्टोरीमध्ये हिनाने एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती एका डेंटिस्टच्या क्लिनिकमध्ये बसलेली आहे आणि म्हणते, "लग्नाच्या आठवड्याभरातच दात दुखायला लागले." तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली. काहींनी तिला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छाही दिल्या. हिना सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. तरीही हिनाचा विनोदी अंदाज आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, यामुळे ती गंभीर परिस्थितीचाही आनंदाने सामना करत आहे.

हिना खानने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाड़ी’ सारख्या शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या हिना आणि रॉकीचा हनिमून सुरू असून चाहत्यांना आशा आहे की, हिना दात दुखीच्या दुखण्यातून लवकरच बरी होईल. हिना सध्या कॅन्सरवरही उपचार घेत आहे. हिना खान आणि रॉकीच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. हिनाला कॅन्सर झाला असूनही रॉकीने तिची साथ सोडली नाही. दोघांनीही लग्न करुन आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

टॅग्स :हिना खानकर्करोगकॅन्सर जनजागृतीटेलिव्हिजनदातांची काळजीबॉलिवूड