Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी भारतात नव्हतो म्हणून लोकांना वाटलं की मी मरण पावलो', हॉलिवूड सिनेमामुळे हरीश पटेल पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:36 IST

Harish Patel : हरीश म्हणाले की, अचानक त्यांच्या इंटरनॅशनल प्रोजेक्टनंतर लोकांनी शोधणं सुरू केलं. एकदम १४ वर्षानंतर लोकांचं माझ्या इतकं प्रेम दिसू लागलं आणि लोक म्हणू लागले होते की, सर तुम्ही आधी का सांगितलं नाही.

हरीश पटेल (Harish Patel) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमात त्यांनी लक्षात राहतील अशा भूमिका केल्या आहेत. मात्र, बरीच वर्ष झाली हरीश हे भारत सोडून यूकेमध्ये शिफ्ट झाले आहेत. ज्यामुळे ते बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड किंवा टीव्हीवर दिसले नाहीत. अशात लोकांना वाटत होतं की, हरीश आता या जगात नाहीत. याबाबतची खंत त्यांनी बोलून दाखवली.

हॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर पाहून चर्चा

एका मुलाखतीत हरीश म्हणाले की, जसा लोकांनी माझा हॉलिवूड सिनेमा Eternals चा ट्रेलर पाहिला. तेव्हापासून माझ्याबाबत चर्चा होऊ लागली. अचानकपणे मी पुन्हा लोकांच्या नजरेत आलो. याआधी लोकांनी हे मान्य केलं होतं की, मी आता या जगात नाही. हरीश पुढे म्हणाले की, मी हा विचार करत होतो की, असं काही मानण्याआधी लोकांनी मला एकदा विचारलं का नाही? चला गुगल तरी सर्च करायचं असतं की, हरीश पटेल जिवंत आहे की गेला. कारण मी इथे काम करत नव्हतो. किंवा दिसत नव्हतो. तर लोकांनी मान्य केलं की, मी आता नाही.

यूकेमध्ये काय करत आहेत ते?

हरीशची १९९८ मध्ये आलेल्या गुंडा सिनेमातील भूमिका फार गाजली होती. यूकेमध्ये हरीश थिएटरवर काम करत आहेत. तेथील जीवनाबाब हरीश म्हणाले की, मला इथे माझं पहिलं प्रेम थिएटर जिवंत ठेवण्याची संधी मिळाली. मी प्ले करत होतो. रॉयल नॅशनल थिएटरमध्ये माझं राफ्ता राफ्ता नाटक फार गाजलं. तसेच मी तिथे अनेक टीव्ही मालिकांचाही भाग झालो.

हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बघून लोकांनी शोधणं सुरू केलं

हरीश म्हणाले की, अचानक त्यांच्या इंटरनॅशनल प्रोजेक्टनंतर लोकांनी शोधणं सुरू केलं. एकदम १४ वर्षानंतर लोकांचं माझ्या इतकं प्रेम दिसू लागलं आणि लोक म्हणू लागले होते की, सर तुम्ही आधी का सांगितलं नाही. मी विचारही केला होता की लोकांना याची आधी माहिती द्यावी. पण मग काय मजा, लोकांना  माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी मेहनत तर करू द्यायची होती. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीहॉलिवूड