Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अग्गंबाई सासूबाई’ची खिल्ली उडवणा-या पोस्टवर गिरीश ओक भडकतात तेव्हा...! वाचा काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 12:17 IST

‘अग्गंबाई सासूबाई’ ही तशी लोकप्रिय मालिका. पण या मालिकेची आणि त्यातील पात्रांची खिल्ली उडवणारेही कमी नाहीत.

ठळक मुद्देआधी तर त्यांनी ही टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारल्याचे सर्वांना वाटले. पण नंतर गिरीश ओक यांनी संतापून कमेंट्स केल्याचे लोकांच्या लक्षात आले.

अग्गंबाई सासूबाई’ ही तशी लोकप्रिय मालिका. पण या मालिकेची आणि त्यातील पात्रांची खिल्ली उडवणारेही कमी नाहीत. ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील प्रेमळ आसावरी, उतारवयात सासूचे लग्न लावून देणारी आणि तिच्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी तिची सून शुभ्रा, प्रत्येक पावलावर आसावरीची सोबत देणारा तिचा नवरा अभिजीत आणि अतिलाडाने बिघडलेला बबड्या उर्फ सोहम या व्यक्तिरेखांवरचे अनेक मीम्म सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स बघून नेटक-यांचे मनोरंजन होत आहे. दुसरीकडे अभिजीतची भूमिका साकारणारे गिरीश ओक मात्र प्रचंड संतापले आहेत.

होय, निशा सोनटक्के नामक एका युजरने ‘अग्गंबाई सासूबाई’वर विनोदी अंगाने टीका केली आणि निशाची ही पोस्ट वाचून गिरीश ओक भडकले. इतके की, एक ज्येष्ठ कलाकार असूनही आपण एका सामान्य युजरवर टीका करतोय, हेही ते विसरले. गिरीश ओक यांनी निशा यांच्या पोस्टवरील कमेंट्समध्ये सहभागी होत लोकांना उत्तरे द्यायला सुरुवात केली.

आधी तर त्यांनी ही टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारल्याचे सर्वांना वाटले. पण नंतर गिरीश ओक यांनी संतापून कमेंट्स केल्याचे लोकांच्या लक्षात आले.

‘तुमचा वेळ मजेत जातोय नं? मग झालं तर वर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत. काहीही (बुद्धिही)खर्च न करता वेळ जातोय तुमचा. तुमच्या ह्या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय,’ अशी एक कमेंट गिरीश ओक यांनी केली.

त्यांच्या या कमेंटची चर्चा रंगली नसेल तर नवल. मग या कमेंटवरून लोकांनी गिरीश ओक यांना ट्रोल करणे सुरु केले.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईगिरिश ओक