बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्याच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. मात्र, ही चर्चा चित्रपटाच्या कौतुकासाठी नसून त्याभोवती निर्माण झालेल्या वादामुळे आणि लखनऊमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमुळे (FIR) आहे. आता या संपूर्ण वादावर स्वतः मनोज वाजपेयीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय आहे प्रकरण?
मनोज बाजपेयीच्या नवीन वेब सीरिजचे नाव 'घूसखोर पंडित' (Ghooskhor Pandat) असे ठेवण्यात आले आहे. या नावामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत लखनऊमध्ये निर्माते आणि कलाकारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'पंडित' या शब्दासोबत 'घूसखोर' (लाचखोर) शब्द जोडणे हे समाजाचा अपमान करणारे आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
मनोज बाजपेयीची प्रतिक्रिया
या वादावर मौन सोडताना मनोज वाजपेयी म्हणाला की, "कोणत्याही कलाकृतीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसतो. आम्ही नेहमीच समाजातील विविध घटकांचा आदर करतो." त्याने पुढे असेही स्पष्ट केले की, कलाकार म्हणून तो केवळ कथेची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. सीरिजचे नाव किंवा विषयाचा कोणाला वैयक्तिक त्रास व्हावा, असा कोणताही हेतू नसल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
'माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा अशी होती, ज्यामध्ये मला एका माणसातील उणिवा आणि त्याला स्वतःच्या चांगल्या-वाईट कामांची जाणीव होण्याचा प्रवास दाखवायचा होता. हे कोणत्याही समुदायाबद्दल नव्हते. नीरज पांडे यांच्यासोबत काम करण्याच्या माझ्या अनुभवाबद्दल सांगायचे तर, ते चित्रपटांच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने काम करतात आणि सतर्क असतात. लोकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांनी असा निर्णय घेतला आहे की, या चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित व्हिडीओ-फोटो हटवले जाईल. यावरून हेच स्पष्ट होते की लोकांच्या चिंता किती गांभीर्याने घेतल्या जात आहेत.'
नाव बदलण्याची शक्यता?
वाढता विरोध आणि कायदेशीर पेच पाहता, निर्माते आता या सीरिजचे नाव बदलण्याबाबत विचार करत असल्याची चर्चा आहे. मनोजने लिहिलंय की, जर एखाद्या नावामुळे लोकांमध्ये संताप असेल, तर त्यावर शांततेने तोडगा काढणे केव्हाही चांगले. तो म्हणाला, "आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतो, त्यांच्या भावनांचा विचार करणे ही आमची जबाबदारी आहे."
आता 'घूसखोर पंडित' या सीरिजचे नाव बदलून निर्माते हा वाद मिटवणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मनोज वाजपेयीचे चाहते मात्र या कथेबद्दल आणि त्याच्या अभिनयाबद्दल अजूनही उत्सुक आहेत.
Web Summary : Manoj Bajpayee addresses the controversy surrounding his web series 'Ghooskhor Pandit' after an FIR was filed. He emphasizes respecting sentiments and the story's demands, considering a title change.
Web Summary : मनोज बाजपेयी ने अपनी वेब सीरीज़ 'घूसखोर पंडित' के विवाद पर प्रतिक्रिया दी। उन्होंने भावनाओं और कहानी की माँगों का सम्मान करने पर ज़ोर दिया, शीर्षक बदलने पर विचार किया जा रहा है।