Join us

Gautami Patil : गौतमीला चाहत्यांनी दिल्या भेटवस्तू, विठ्ठलासमोर फोटो पाहून भडकले नेटकरी, 'आमच्या देवापुढे या बाईचा..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 15:24 IST

विठ्ठलापुढे गौतमीचा फोटो पाहून नेटकरी संतापले

सबसे कातील गौतमी पाटील हे सध्या गावागावात ऐकू येतंय. गौतमी पाटीलचे कार्यक्रम गाजत आहेत. वाढदिवस असो किंवा लग्न किंवा राजकीय कार्यक्रम गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अश्लील डान्स केला म्हणून सुरुवातीला गौतमी खूप ट्रोल झाली. मात्र तिने नंतर माफी मागितली. एकीकडे टीका तर दुसरीकडे तरुणाई तिच्या डान्सवर फिदा असते. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दीच सगळं काही सांगून जाते. 

गौतमीचे चाहते आता गावागावात आहेत. सोशल मीडियावरही तिचे ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. गौतमीला अनेक चाहत्यांनी भेटवस्तू पाठवल्या. तिचे सुंदर स्केच चाहत्यांनी बनवले आहेत आणि ते गौतमीला पाठवलं आहेत. गौतमीने त्या सर्व भेटवस्तूंचे फोटो इन्स्टाग्रामवर ठेवले असून चाहत्यांचे आभार मानलेत.

या सर्व फोटोंमध्ये एका फोटोने लक्ष वेधलं आहे. एका स्केचमध्ये विठ्ठलाच्या फोटोपुढे गौतमीचं स्केच काढण्यात आलंय. यामुळे काही नेटकरी भडकले आहेत. 'आमच्या देवापुढे ह्या बाईचा फोटो लावू नका','विठ्ठलासोबत ह्या बाईचा फोटो का ठेवलाय देव आहे का ही...पागल आहे तो फोटो कोणी केला तो' अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत. 

टॅग्स :गौतमी पाटीलसोशल मीडियाट्रोल