Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?" गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:55 IST

आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. तिची मुलाखत सध्या व्हायरल होत आहे.

Gautami Patil : आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. आधी अश्लील नृत्य केल्याने तिच्यावर टीका झाली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत: नाराजी दर्शवल्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. नृत्यात सुधारणा करेल असं तिने म्हटलं होतं. यानंतर गौतमीची क्रेझ वाढतच गेली. आज गावागावात तिचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. नुकतेच तिने एका मुलाखतीत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे या प्रश्वाचे मजेशीर उत्तर दिले.

गौतमीने 'दॅट ऑड इंजिनिअर' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये गौतमीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिचं बालपण कसं गेलं, शिक्षण किती झालं, तिच्या आवडी निवडी काय, लग्न कधी करणार अशा अनेक प्रश्नांची गौतमीने दिलखुलास उत्तरं दिली. तर काही रॅपिड फायर प्रश्न विचारुन तिची कोंडीही करण्यात आली. रॅपिड फायरमधलाच एक प्रश्न असा होता 'एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे' दोन्हीपैकी एक निवडायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र गौतमी गोंधळली आणि तिने उत्तर देणं टाळलं. गौतमी हसतच पुढे म्हणाली, 'तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार'. तिने असं म्हणताच एकच हशा पिकला.  

यापूर्वी अजित पवारांची नाराजी ओढवून घेतलेल्या गौतमीला आता पुन्हा अडचणीत यायचं नव्हतं. म्हणून हुशारीनेच तिने उत्तर देणं टाळलं. सध्या राजकारणातील परिस्थिती बघता दोन गट पडल्याने कोण कुठल्या गटात आहे हे खुलेपणाने सांगणंही अनेकांसाठी कठिणच झालंय. मग गौतमीची तरी यातून सुटका कशी होणार.

गौतमीची वाढती क्रेझ

सध्या गौतमीचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी ती तबब्ल दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते. अगदी लहान वयातच तिची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'सबसे कातील गौतमी पाटील' असं ठिकठिकाणी ऐकू येत आहे.  गौतमी लवकरच आगामी 'घुंगरु' या सिनेमात दिसणार आहे. काही व्हायरल व्हिडिओमुळे गौतमीचं नशीबच चमकलंय.

टॅग्स :गौतमी पाटीलनृत्यएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमुलाखत