Join us

वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच गश्मीरने चाहत्यांशी साधला संवाद, म्हणाला, 'माझी आई...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:03 IST

गश्मीरने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलंय.

मराठीतील अतिशय देखणे अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं 11 जुलै रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने कुटुंबासोबतच चाहत्यांनाही धक्का बसला. तळेगावला एका भाड्याच्या फ्लॅटवर ते एकटेच राहत होते. त्यांचं निधन झाल्याचं दोन दिवसांनी कळलं. असा मृत्यू आल्याने सर्वच हळहळले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाला विशेषत: मुलगा गश्मीरला (Gashmeer Mahajani) प्रचंड ट्रोल केले गेले. वडिलांच्या निधनानंतर २० दिवसांनी मुलगा गश्मीरने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

गश्मीरने इन्स्टाग्रामवर 'आस्क गश' हे चाहत्यांसाठी सेशन घेतले. यामध्ये चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या कठीण काळातून तू कसा सावरत आहेस, ट्रोलिंगला कसा सामोरा जात आहेस असे अनेक प्रश्न विचारले. 'तू कसा आहेस?' चाहत्याच्या या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, 'माझी आई हळूहळू बरी होत आहे...आम्ही यातून बाहेर पडू.'

'तू परत कामावर कधी येणार?' यावर तो म्हणाला, 'अजून तरी नाही. लवकरच सुरु करेन. एकदा आईची तब्येत स्थिर झाली की शूट सुरु करेन.'

गश्मीर सध्या कुटुंबाची काळजी घेत आहे. विशेषत: त्याची आई अद्याप या धक्क्यातून सावरली नाही. त्यामुळे तो आईकडे लक्ष देत आहे. आईची तब्येत सुधारल्यानंतर गश्मीर लवकरच शूटिंग सुरु करेल असंही आश्वासन त्याने चाहत्यांना दिलंय. तसंच ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही त्याने चाहत्यांना सांगितलं.

टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनीपरिवारसोशल मीडियाट्रोल