Join us

Bigg Boss 19: 'गँग्ज ऑफ वासेपूर'मधील 'हा' अभिनेता 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:33 IST

'बिग बॉस १९'मध्ये 'गँग्ज ऑफ वासेपूर' प्रसिद्ध अभिनेता सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. कोण आहे तो?

'बिग बॉस १९'ची सध्या सर्वांना खूप उत्सुकता आहे. सलमान खान पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'गँग्स ऑफ वासेपूर' (Gangs of Wasseypur) या लोकप्रिय चित्रपटातील एक महत्त्वाचा कलाकार या शोमध्ये झळकणार आहे. या कलाकाराचं नाव आहे झीशान काद्री (Zeishan Quadri). झीशान आता 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

झीशान काद्रीने 'गँग्स ऑफ वासेपूर' मध्ये 'डेफिनेट' नावाची एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. इतकेच नाही, तर झीशाननेच या चित्रपटाचे लेखनही केले आहे, त्यामुळे झीशानला इंडस्ट्रीत चांगलीच ओळख मिळाली. पण 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर झीशानला बॉलिवूडमध्ये इतकं काम मिळालं नाही. झीशानचा आता 'बिग बॉस'सारख्या मोठ्या मंचावर प्रवेश झाल्यास, त्याच्या चाहत्यांना त्याला एका नवीन भूमिकेत आणि खऱ्या व्यक्तिमत्वात पाहायला आवडेल. 

'बिग बॉस' हा शो नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांतील वादग्रस्त आणि प्रसिद्ध व्यक्तींना एकत्र आणतो. झीशान काद्रीसारख्या प्रतिभावान कलाकाराचा शोमध्ये सहभाग झाल्यास, शोची उत्सुकता आणि रंजकता नक्कीच वाढेल. सध्या 'बिग बॉस १९' च्या स्पर्धकांच्या यादीबद्दल अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे यादी जाहीर केलेली नाही. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रीमिअर २४ ऑगस्ट २०२५ रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉसअनुराग कश्यपटिव्ही कलाकारटेलिव्हिजन