Join us

माझं हृदय मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले! Urvashi Rautela काही रिषभ पंतची पाठ सोडेना, भन्नाट मिम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 12:55 IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्यातला ड्रामा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्यातला ड्रामा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. एका मुलाखतीत उर्वशीने केलेल्या दाव्यानंतर रिषभ संतापला अन् या दोघांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झाले. त्यानंतर उर्वशीने माफिही मागितली, परंतु सारवासारव करत ही माफी फ‌ॅन्ससाठी असल्याचेही म्हटले. त्यानंतर उर्वशीने भारतीय क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शूभेच्छाही दिल्या. त्यात आता ती पण ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.  भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच पर्थमध्ये दाखल झाला आहे. उर्वशीही तेथे दाखल झाल्याने नेटिझन्स संतापले आणि त्यांनी मिम्स व्हायरल करून अभिनेत्रीला ट्रोल करण्य़ास सुरुवात केले.

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करून ऑस्ट्रेलियाला जात असल्याचे सांगितले. त्या पोस्ट वर तिने लिहिलेला मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेतोय... तिने लिहिले की, मी माझ्या हृदयाचं ऐकते आणि ते मला ऑस्ट्रेलियात घेऊन चालले आहे. 

 आता उर्वशिच्या या पोस्टनंतर नेटिझन्सही सुसाट सुटले.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलिया