Join us

First Look : ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 15:17 IST

अभिनेत्री कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. टीम कंगना राणावतच्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये कंगणा राणावत पारंपरिक वेशात दिसत आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. टीम कंगना राणावतच्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये कंगणा राणावत पारंपरिक वेशात दिसत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या शूटींगदरम्यानचे कंगणा राणावतचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. यामध्ये कंगणा राणावतच्या हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, सौंदर्यात भर घालणारे दागिने दिसत आहेत. तसेच, तिच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसून येत आहे.  

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने खास तलवारबाजीचे धडेही गिरवले आहेत. तिच्याबरोबर अतुल कुलकर्णी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच टेलिव्हिजन गाजवलेली अंकिता लोखंडेला एका मोठ्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे. 

हा सिनेमा 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी असे काही नसल्याचे स्पष्ट केले होते.