मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते प्रसिद्धीच्या शिखरावर असतात. पण काही अभिनेत्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि यश सांभाळता येत नाही. त्यामुळे या अभिनेत्यांची पुढे वाईट अवस्था होते. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालची अशीच अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. सुनील नुकतंच कपिल शर्माच्या एका सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सुनीलची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.काळवंडलेला चेहरा, डोक्यावर टोपी...सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त आणि टीकात्मक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. सुनील पाल कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू २' या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सैल शर्ट, पायात स्लीपर, डोक्यावर टोपी आणि काळवंडलेला चेहरा अशा अवतारात सुनीलला पाहून चाहते हैराण झाले आहेत. सुनीलला सहकलाकारांनी आर्थिक मदत करावी, अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुनील आणि कपिल शर्मा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मित्राच्या सिनेमाला शुभेच्छा द्यायला सुनील उपस्थित होता.
Web Summary : Comedian Sunil Pal's disheveled appearance at a promotional event has sparked concern among fans. Sporting a faded look with a cap and slippers, his condition prompted calls for support from colleagues. Previously, Pal faced a kidnapping ordeal, highlighting recent struggles.
Web Summary : कॉमेडियन सुनील पाल को एक प्रमोशनल इवेंट में अस्त-व्यस्त देखकर प्रशंसक चिंतित हैं। टोपी और चप्पल पहने हुए उनका फीका लुक देखकर उनके सहयोगियों से समर्थन की अपील की गई। इससे पहले, पाल को अपहरण का सामना करना पड़ा था, जिससे हाल के संघर्षों पर प्रकाश डाला गया।