दाक्षिणात्य सिनेमा नेहमीच एक पाऊल पुढं राहिला आहे. एक झालं की एक धमाकेदार सिनेमे अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावून सोडत असल्याचं पाहायला मिळतं. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत कलाकारही एकापेक्षा एक आहेत. त्यापैकीच एक स्टार साउथ स्टार फहाद फासिल (Fahadh Faasil). पुष्पा' आणि 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटातील धाकड परफॉर्मन्सनंतर फहाद फासिलची प्रचंड क्रेझ भारतात निर्माण झाली. फहाद फासिलने त्याच्या कित्येक सिनेमा मधून दर्जेदार काम केलंय. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
फहाद फासिलच्या एका चित्रपटाचं सध्या कौतुक होतंय. त्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचं नाव आहे 'बोगेनविले' (Bougainvillea). फहाद फासिलची भुमिका असेलला हा चित्रपट तुम्ही घरबसल्या OTT वर पाहू शकता. हा चित्रपट १७ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला, परंतु ओटीटीवर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अत्यंत रोमांचक असा २ तास २४ मिनिटांचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म SonyLIV वर उपलब्ध आहे.
'बोगेनविले' या चित्रपटाचे दिग्दर्शक अमल नीरद आहेत. या चित्रपटाला IMDb वर ६.४/१० रेटिंग मिळाले आहे. फहाद फासिल (याने जबरदस्त स्क्रिन पकडून ठेवल्याचं दिसत. जर तुम्ही सस्पेन्सफुल थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला 'बोगेनविले' नक्कीच आवडेल आणि फहादचा अभिनय नक्की प्रेमात पाडेल.