‘लायन्स गेट लाईव्ह ! अ नाईट एट मुव्हीज’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून लायन्सगेट इंडिया यांनी अलिकडेच एक अनोखा उपक्रम जाहीर केला आहे. यानुसार फेसबुकच्या सहकार्याने चित्रपटांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करत निधी उभारून कोविड प्रभावितांना मदत करणार आहेत. यासाठी अभिनेते अनिल कपूर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या उपक्रमाची माहिती देणारा एक व्हिडिओ अनिल कपूर यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यातून ते सिनेप्रेमीना १५ मे रोजी या उपक्रमांतर्गत दाखवल्या जाणाऱ्या Now you see me 2 बघण्याची विनंती करत आहेत. हा सिनेमा लायन्स गेट यांच्या फेसबुक पेजवरून शुक्रवार, १५ मे रोजी रात्री ८ वाजता प्रक्षेपित केला जाईल.
फेसबुकवर चित्रपट पहा अन् कोरोनाग्रस्तांना करा मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:06 IST
अभिनेते अनिल कपूर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
फेसबुकवर चित्रपट पहा अन् कोरोनाग्रस्तांना करा मदत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}